जिलेटीनचा भीषण स्फोट : तीन मजूरांचा मृत्यू

टीम AM : विहीर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनचा भीषण स्फोट झाल्याने तीन मजूर जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीनही मजूर हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील आहेत. 

नाशिकच्या हरसूलमधील रिवडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदण्याचे काम सुरु आहे.  बुधवारी सकाळी 10 वाजता अचानक जिलेटीनचा भीषण स्फोट झाला. 

यात दोन मजूर बाहेर फेकले गेले. तर एक मजूर विहिरीत दबला गेला, तिन्ही मजूरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये लहू महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावे आहेत. तीनही मजूर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.