अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा निरर्थक : शरद पवार

टीम AM : विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना आजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना सत्तेत राहणार नाही

दरम्यान, अजित पवार हे समर्थक आमदारांचा गट घेऊन सत्तेत आल्यास, शिवसेना सत्तेत राहणार नाही, असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशली बोलताना शिरसाट यांनी, ही बाब स्पष्ट केली. सोळा आमदार अपात्र ठरले, तर अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील, या जर तरच्या विधानांना काहीही अर्थ नसल्याचं शिरसाट त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांना ठळक स्थान दिलं जात नसल्याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधलं.