टीम AM : शेवंता या नावाने महाराष्ट्रातील घरा – घरात पोहोचलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतेच अपूर्वाच्या धाकट्या भावाचे निधन झाले. याबाबत पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे. अपूर्वा नेमळेकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने त्याच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट शेअर केले आहेत. यात तिने भावूक लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
अपूर्वाची पोस्ट..
माझा प्रिय भाऊ ओमी,
आयुष्यात कधी कधी नुकसान, तोटा होत असतो. यात आपण काहीही बदल करु शकत नाही. पण तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. खरं सागूं तर मी तुला निरोप द्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायलाही तयार नव्हते. एक दिवस किंवा एका सेकंदसाठी मी काहीही द्यायला तयार होते. पण मृत्यूबद्दलचं एक सत्य म्हणजे, प्रेम कधीच मरत नाही, म्हणून मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. काही नातेसंबंध हे कधीच तोडता येत नाही.
कारण जरी शारीरिकदृष्ट्या तू इथे नसला तरी तुझे हृदय इथेच असेल, ते माझ्याजवळ कायमच राहील. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ किंवा जागाही वेगळं करु शकत नाही. पण त्या दिवसापर्यंत तुझे हृदय कायमच माझ्याबरोबर असेल. काही हृदयं ही फक्त एकत्र येतात आणि त्यात काहीच बदल होत नाही. माझे तुझ्यावर प्रेम होते, प्रेम आहे आणि ते नेहमीच राहिल. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace, अशी पोस्ट अपूर्वा नेमळेकरने केली आहे.
अपूर्वाचा लहान भाऊ ओमकारला वयाच्या 28 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले आहे. भावाच्या जाण्याने अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.