टीम AM : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातल्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे.
या संदर्भात मंत्रालयानं ट्विटरवरुन माहिती देताना, या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढेल, असं म्हटलं आहे.
हा निर्णय प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता दर्शवतो, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. एक जानेवारी 2024 पासून हा निर्णय लागू होईल.