बेरोजगार तरूण – तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग, हजारो बेरोजगार तरुण उतरले रस्त्यावर
टीम AM : डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सरकारी नोकरीचे खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा, सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नोकरभरती करा, खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत. यावेळीही बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हा मोर्चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार युवक उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी डी.वाय.एफ.आयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव, तालुकाध्यक्ष देविदास जाधव, तालुका सचिव प्रशांत मस्के, सचिन टिळक उपस्थित होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राघवेंद्र साखरे, जगन्नाथ पाटोळे, राम गडदे, परमेश्वर लांडगे, शंकर चामनर, रसूल शेख, आकांक्षा सोनवणे, निकिता राठोड, किरण जाधव, निकिता गोचडे, भाग्यश्री शिंदे, बबलू सरवदे, सिद्राम सोळंके, मुंजाहरी नवगिरे, रिद्धी देशमुखआदींनी प्रयत्न केले.