आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी… बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त परवीन बाबीचा जीवनप्रवास

टीम AM : परवीन मोहम्मद अली म्हणजे परवीन बाबी बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री. अभिनेत्री परवीन बाबीचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी गुजरात येथील जुनागढ येथे झाला.

परवीन बाबीने 1973 साली ‘चरित्र’ या चित्रपटातून पदार्पण केले. परवीन बाबी 1976 मध्ये टाईम मासिकाच्या एशिया आवृत्तीच्या कव्हर पेजवर दिसली होती. हे स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती.

परवीन जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिने अचानक चित्रपटसृष्टीतील या झगमगत्या जगापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने अध्यात्मिक प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर तिला पॅरानोइड स्किझोफ्रेनिया झाला असल्याची बातमी आली. 22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि डायबेटीसमुळे तिचे निधन झाले असे सांगण्यात आले.

परवीन बाबी तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची तिची जोडी पडद्यावर सर्वात जास्त गाजली. मात्र, एक काळ असा आला की परवीनने अमिताभ बच्चन यांच्यावर धक्कादायक आरोप केले. अमिताभ गँगस्टर आहेत असा आरोप परवीनने केला होता. अमिताभ बच्चन यांना तिला मारायचे होते, असा दावाही तिने केला.

जेव्हा परवीनला मानसिक आजार असल्याचे निदान झाले तेव्हा एकेकाळी तिच्याशी रिलेशनशिपमध्ये असलेल्या महेश भट्ट यांनी तिच्या उपचारावर कोणतीही कसर ठेवली नाही. परवीन बाबी बाबत महेश भट्टची ही काळजी त्यांच्या ‘वो लम्हे’ या चित्रपटातही पाहायला मिळाली होती.

परवीन बाबी यांनी सर्वांनी प्रेम केलं. परंतू, त्यांच्या अंत्यसंस्काराला मोजकेच लोक होते. परवीन अवघ्या 5 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. आई – वडिलांच्या लग्नाच्या 14 वर्षांनंतर नवसाने परवीन झाली होती. अहमदाबादमधून पदवी घेऊन परवीन मायानगरी मुंबईत आली. परवीन सुरुवातीच्या दिवसात मॉडेलिंग करायची.

जेव्हा फिल्ममेकर बी. आर. इशारा यांनी तिला रस्त्याच्या कडेला सिगारेट ओढताना पाहिले होते. तेथून परवीनचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘चंदी सोना’, ‘शान’, ‘सुहाग’, ‘काला पत्थर’ असे 10 वर्षांत परवीनने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. परवीन बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली. पण नंतर अचानक एक दिवस ती सेटवरून गायब झाली.

परवीन बाबीला गंभीर मानसिक आजार जडला होता, त्यामुळे त्या सर्वांपासून दूर गेल्या. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगितले जाते. 20 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले. तीन दिवस त्यांचा मृतदेह पलंगावर पडून होता. तीन दिवस त्यांच्या दाराजवळ ब्रेड आणि दुधाचे सामान पडून होते, तेव्हा लोकांनी पोलिसांना कळवले. मात्र, तोपर्यंत त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.