पदवी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करणार : कुलगुरु डॉ. येवले

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा इशारा, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. 

परीक्षेची वेळ संपल्यावर देखील विद्यार्थ्यांना बोलवून उत्तरपत्रिका लिहिण्यात आल्याची तक्रार असलेल्या, शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी, त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. 

याशिवाय, वाल्मिकराव दळवी महाविद्यालय तसंच शहरातल्या नवखंडा इथलं डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन प्राध्यापकांचं बैठं पथक परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वीपासून ते उत्तरपत्रिका सील करेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचं कुलगुरूनीं सांगितलं.