टीम AM : ‘मैदान’ या चित्रपटात भारतीय फूटबॉलसाठीचा सुर्वणकाळ दाखवण्यात येणार आहे. ऑलंपिक स्पर्धेत भारताने फुटबॉलमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीचा संघर्ष चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. अजय देवगण या चित्रपटात फुटबॉलच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘मैदान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्र शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. ‘मैदान’ हा चित्रपट 23 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित झाला आहे.