टीम AM : राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.
पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे.