टीम AM : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं पॅन आणि आधार क्रमांक जोडण्याची मुदत या वर्षीच्या 30 जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत येत्या एकतीस मार्चला संपत होती.
या वर्षीच्या तीस जूनपर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्या करदात्यांचे पॅन क्रमांक निष्क्रीय केले जातील, असं मंडळानं म्हटलं आहे. याशिवाय, अशा पॅनवर कोणताही कर परतावा दिला जाणार नाही, असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे.
निष्क्रीय झालेलं पॅन कार्ड तीस दिवसात एक हजार रुपये शुल्क भरून सक्रीय करता येईल, असं मंडळानं सांगितलं आहे.