टीम AM : तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेरीस पूर्ण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
उद्योग व व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेल्या तज्ज्ञांसाठीचे मानधन 750 रुपयांवरून 1500 रुपये करण्यात आले आहे. प्रात्यक्षिकासाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. कला शाखा पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमासाठी 900 रुपये प्रतितास.
कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अध्यापनासाठी प्रतितास 900 रुपये, प्रात्यक्षिकासाठी 350 रुपये, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 1000 रुपये तर शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणसाठी 1000 रुपये, विधी अभ्यासक्रमासाठी 1000 रुपये, प्रशिक्षित कनिष्ठ अधिव्याख्यातांचे मानधन 300 रुपये तर अप्रशिक्षित कनिष्ठ अधिव्याख्यातांचे मानधन 250 रुपये करण्यात आले आहे.
ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची 223 पदे भरणार
राज्य सरकारने ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी लावण्यात आलेले निर्बंधही उठविण्यात आले आहेत. यामुळे येत्या काळात ही 223 पदे भरली जाणार आहेत.