दिग्दर्शकासोबत रिलेशनशिप ‘या’ अभिनेत्रीला पडली होती महागात, दुर्दैवानं गमावला जीव

टीम AM : दिग्दर्शक चेतन आनंद आणि अभिनेत्री प्रिया राजवंश यांच्या प्रेमाचे किस्से जगजाहिर आहेत. परंतु चेतन यांचं निधन झाल्यानंतर प्रिया यांची हत्या करण्यात आली होती. वाचा काय होतं कारण….

बॉलिवूडमध्ये प्रिया राजवंश या अभिनेत्रीला आतापर्यंतच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. प्रियानं आपल्या अभिनयाच्या बळावर 1960 – 70 चं दशक गाजवलं होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटासारखं गेलं. 1964 साली आलेल्या ‘हकीकत’ चित्रपटातून प्रिया यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यांना प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे भाऊ चेतन आनंद यांनी काम करण्याची संधी दिली होती. त्या काळचे ते फार चर्चित आणि प्रसिद्ध लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर होते.

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार प्रिया यांनी सर्वात जास्त चित्रपट हे चेतन यांच्यासोबतच केले होते. त्यामध्ये ‘हीर रांझा’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हंसते जख्म’, ‘साहेब बहादुर’, ‘कुदरत’ आणि ‘हाथों की लकीरें’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार चेतन आणि प्रिया यांनी बराच काळ सोबत काम केलेलं असल्यानं त्यांच्यात मधूर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. कारण त्या काळात ते दोघं एकमेकांना पसंत करत होते. 

परंतू चेतन हे आधीच विवाहित होते, पण ते पत्नी आणि मुलांपासून विभक्त राहत होते. त्यामुळं चेतन आणि प्रिया हे आनंदानं राहत होते. परंतू चेतन यांचा 1997 साली अचानक मृत्यू झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. कारण चेतन यांनी त्यांची सर्व संपत्ती ही प्रिया यांच्या नावावर केली होती.

त्यामुळं चेतन यांनी मृत्यूआधी सर्व संपत्ती प्रिया यांना देणं हे त्यांच्या आधीच्या पत्नीच्या मुलांना आवडलेलं नव्हतं. ते प्रिया यांच्यावर नाराज होते. त्यामुळंच चेतन यांच्या मुलांनी प्रिया यांची हत्या केली. या घटनेमुळं संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. त्यानंतर कोर्टात चेतन यांच्या दोन मुलांना दोषी ठरवण्यात आलं. आजही त्यांची ती केस न्यायालयात सुरु आहे. जेष्ठ अभिनेत्री प्रिया राजवंश यांचा आज स्मृतीदिन आहे, त्यांना भावपूर्ण आदरांजली.