टीम AM : शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं. त्याची मुदत आज म्हणजेच 27 मार्च रोजी संपणार होती.
मात्र, त्यापूर्वीच समता पार्टीने ‘मशाल’ या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतू न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून नवीन नाव आणि चिन्ह दिलं जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.