रिस्पेक्ट परिवाराचे आवाहन
अंबाजोगाई : कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट- 2019 महिन्यात आलेल्या महापूरात मोठे नुकसान झाले. या भागातील पुरग्रस्त छायाचित्रकार बंधुंना मदत करण्यासाठी ‘रिस्पेक्ट उभारी’ या कार्यशाळेच्या माध्यमातून मदत निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवार,5 ऑक्टोबर 2019 रोजी आद्यकवी मुकुंदराज सभागृह,अंबाजोगाई येथे बिपीनजी गोजे यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून पूरग्रस्तांना मदत उपलब्ध करून द्यावी असे आवाहन रिस्पेक्ट परिवार अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यशाळा प्रवेश नोंदणीसाठी संपर्क:- अभय खोगरे (मो -9850758035), नंदकुमार देशमाने (मो- 9860347515) यांच्याशी संपर्क साधावा.