राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा : वादग्रस्त वक्तव्य भोवलं

टीम AM : 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत इथल्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

याप्रकरणी आज राहुल गांधी न्यायालयात हजर झाले, त्यांना लगेचच वरच्या न्यायालयात अपिल करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला. 

मोदी समाजाने गांधी यांच्याविरोधात हा खटला दाखल करुन मानहानीचा दावा केला होता.