स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 5369 पदांची भरती : ‘ही’ आहे शेवटची तारीख

टीम AM : स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 11 अंतर्गत 5369 रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. ही भरती 10 वी, 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे.  ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 27 मार्चपर्यंत करायचा आहे. निवड पोस्ट 11 ची परीक्षा जून किंवा जुलै 2023 मध्ये घेतली जाईल.

पदाचे नाव

1)सीनिअर टेक्निकल असिस्टंट
2) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
3) चार्जमन
4) लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट
5) फर्टिलाइजर इन्स्पेक्टर
6) कँटीन अटेंडंट
7) हिंदी टायपिस्ट
8) इन्वेस्टिगेटर ग्रेड – II
9) लायब्ररी अटेंडंट
10) सीनिअर सायंटिफिक असिस्टंट

वयाची अट

1 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे (एससी/एसटी : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता

– 10 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण – मॅट्रिक लेवल पदासाठी
– 12 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण – इंटरमिजिएट लेवल पदासाठी
– भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी – बॅचलर पदवी पदासाठी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

27 मार्च 2023 
संगणक आधारित परीक्षा :
जून, जुलै 2023

निवड कशी होईल  ? 

ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड होईल.