प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी : 72 लाख लंपास

टीम AM : प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरातून तब्बल 72 लाख रुपयांची चोरी झाली आहे. 

घरातील इतकी रक्कम चोरी झाल्यानं निगम कुटुंब चिंतेत आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानं पैशांची चोरी केल्याचा संशय सोनू निगमचे वडील आगम निगम यांना आहे. 

या प्रकरणी सोनू निगम आणि त्याच्या वडिलांनी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.