मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ – एसटीने ‘स्लीपर कोच’ अर्थात शयन शायिका सुविधा असलेल्या बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून ‘स्लीपर कोच’ बसला प्राधान्य दिलं जातं, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दापोडी इथल्या मध्यवर्ती कार्यशाळेत 50 ‘स्लिपर ‘कोच’ बस बनवण्यात येत आहेत. या वर्षात या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.