गिरवली – पुस रस्त्यावर भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

अंबाजोगाई : गिरवली – पूस रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.19) रात्री 9 वाजताच्या सुमारास घडला. अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. 

महेश विष्णू कटारे (वय 32, रा. जवळगाव), मनिषा सुभाष डेरनासे (वय 35, रा. जवळगाव) असे मयतांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, हा अपघात महामार्गावरील रस्त्याला भेगा पडल्याने कारचे टायर फुटून झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. 

मनिषा सुभाष डेरनासे यांच्या पतीचा 10 वर्षांपूर्वी विहिरीत काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता. मनिषा यांना मुलगा प्रणव (वय 10) मुलगी वैष्णवी (वय 17) आणि प्रणवी (वय 15) अशी तीन मुलं आहेत. दरम्यान, आता मनिषा यांचे तिन्ही मुलं उघड्यावर आले आहेत.