‘जुनी पेन्शन’ : राज्य सरकारी कर्मचारी संघटनांचे आंदोलन सुरुच, बाईक रॅली, निदर्शने

अंबाजोगाई : राज्यातील दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची ‘जुनी पेन्शन’ योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटना दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. 

अंबाजोगाई शहरातीलही सर्व कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविला असून दररोज विविध माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मागणी पूर्ण करुन घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन, निदर्शने करण्यात येत आहेत. 

‘जुनी पेन्शन’ च्या मागणीसाठी आज दिनांक 18 मार्च रोजी कर्मचारी संघटनांनी शहरातून बाईक रॅली काढत तहसील कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली. यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आजही कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग नोंदविला होता. यावेळी ‘स्वाराती’ रुग्णालयातील सर्व परिचारिका, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.