श्री रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थान मध्ये 29 सप्टेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन

अंबाजोगाई : प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवाच्या निमित्याने येथील श्री क्षेत्र रेणुका देवी व श्री मूळजोगाई देवस्थान मध्ये 29 सप्टेंबर ते 14 आक्टोबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मुख्यव्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय अंबेकर व देवस्थान समितीचे अध्यक्ष ताराचंद परदेशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

श्री रेणुकादेवी व श्री मूळजोगाई देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे जनक वै. मुकुंद अप्पा यादव, वै. शामलाल मोदी, वै. बी. एन. सातपुते या देवस्थानचे मुख्य पुजारी वै. शिवाजीराव अंबेकर यांच्या प्रेरणेने व वै. माधवबुवा शास्त्री यांच्या आशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या नवरात्र महोत्सवातील अखंड हरिनाम सोहळ्याचा प्रारंभ 29 सप्टेंबर रोजी विष्णू सेठ बजाज यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेने होणार असून 15 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहाटे 4 ते 6 काकडारती, 6 ते 7 विष्णूसहस्त्र नाम, 7 ते 8 सप्तशतीपाठ, 8 ते 9 अभिषेक, 9 ते 12 गाथ्यावरील भजन, दुपारी 12 ते 3 महिला भजन, 3 ते 5 हरी कीर्तन, सायं. 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 आरती, रात्री 9 ते 4 हरीजागर आदी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत ह. भ. प. केशव महाराज वाघाळकर, बाबा महाराज जवळगावकर, अच्युत महाराज जोशी, अंबादास महाराज चिक्षे, हरी महाराज राडी, प. ज्ञानेश्वर महाराज पाखरे, बिभीषण महाराज मोरे, नागोराव महाराज शिंदे गित्ता, नाथराव गरजाळे सर, पांडव महाराज सारणीकर, उमाकांत कुलकर्णी महाराज, संभाजी महाराज सारसा, विनायक महाराज काचगुंडे, दीक्षित महाराज सावळेश्वर पैठण यांच्या कीर्तनाचा लाभ भावीकांना होणार आहे.

7 आक्टोबंर रोजी सकाळी 8.30 वाजता अशोक शामलाल मोदी यांच्या हस्ते होमहवन पूजा होऊन दुपारी 4 वाजता तहसिलदार संतोष रुईकर व नगराध्यक्षा रचनाताई मोदी यांच्या हस्ते पालखी पूजा होऊन श्री ची मिरवणूक प्रारंभ होईल, संपूर्ण शहरातुन मीरवणूक सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री पो. नि. सिद्धार्थ गाडे यांच्या हस्ते महाआरती होऊन या मिरवणूकीची सांगता होईल. 13 आक्टोंबर रोजी अरुण काळे यांच्या हस्ते गाथा पूजन किसन महाराज पवार यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून 14 ऑक्टोबर रोजी स्थानिक आराधी मेळाव्याने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे उपाध्यक्ष अशोक मोदी यांच्या सह गोविंदराव बरुरे, गणपत नाना यादव, मनोज जाधव, रामचंद्र बळे, भागवत जाधव, अरुण कुलथे, विनायक मोरे, प्रभाकर जोगी, मंचक मोरे, अर्जुन काटे, मधुकर कदम, रवींद्र परदेशी, कमलेश परदेशी, सितेंद्र सातपुते, श्रीकृष्ण मोदी, रामदास भोसले, हरी लखेरा, र.ना. देशपांडे, बाळू औसेकर, प्रमोद पाटील, संतोष फुटाणे, नंदकिशोर शिंदे, संजय काळम, सचिन शिनगारे, राजकुमार लोमटे, नरसिंग शेळके यांच्यासह आदी सेवेकरी परीश्रम घेत आहेत. अशी माहिती देवस्थानचे मुख्यव्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय अंबेकर यांनी दिली आहे.