२९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव

उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन, किर्तन, प्रवचन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.

२९ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. रविवारी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ते ८ या वेळेत डॉ. वैशाली गोस्वामी यांचे किर्तन तर रात्री ८ ते १० या वेळात मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज पवार यांचे किर्तन होणार आहे. ३० सप्टेंबर सोमवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे पखावज वादक पं. उद्धवबापू आपेगावकर व शेख ऐेनोद्दीन यांचे बासरी वादन व पखावज जुगलबंदी हा कार्यक्रम होणार आहे. १ आँक्टोबर मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संगीत भजन तर दुपारी ३ वाजता सुभाष शेप यांचे गायन, ४ वाजता अशोक खंदारे यांचे गायन, ५ वाजता अरूण जोशी यांचे गायन, रात्री ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. अंबादास महाराज चिक्षे यांचे किर्तन तर ८ ते १० या वेळेत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सूरमणी भाग्यश्री पाटील, राणी वडगावकर, पांडुरंग देशपांडे, यांचे गायन होणार आहे.

बुधवार २ ऑक्टोबर रोजी ११ ते ४ या वेळात संगीत भजन, दुपारी ४ ते ५ या वेळेत निटुरकर महाराज हैद्राबाद यांचे प्रवचन, तर ५ ते ७ या वेळेत प्रसिद्ध गायक पं. शिवकुमार मोहेकर यांचा जगदंबेचा गोंधळ हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७ ते ८ यावेळेत मंजुषा देशपांडे यांचे गायन तर रात्री ८ ते १० या वेळेत पुणे येथील प्रसिद्ध गायिका आसावरी देसाई, नरसिंह देसाई, पं. शिवदास देगलुरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ३ ऑक्टोबर गुरुवारी ११ ते ४ यावेळेत संगीत भजन, ४ वाजता जयेंद्र कुलकर्णी यांचे गायन, ६ ते ८ या वेळेत स्थानिक कलावंत दत्तोपंत मुकदम, बाळासाहेब मांडवकर, दिवाकर देशपांडे, सुधीर कुलकर्णी, सुर्यकांत कंगळे, श्रीरंग सुरवसे, श्रीपाद खारकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत पुणे येथील प्रसिद्ध गायिका रेवा नातू यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ४ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत संगीत भजन, दुपारी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प. नंदिनीताई सानप यांचे किर्तन, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्थानिक कलावंत श्रीधर काळेगावकर, सुधाकर देशपांडे, मंगला वैष्णव, संगिता काटे, वंदना कोदरकर, मधुरा बाभुळगावकर, सारिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत लातूर येथील प्रसिद्ध गायक डॉ. वृषाली देशमुख व शशिकांत देशमुख यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी ५ ऑक्टोबर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत संगीत भजन, ४ ते ६ या वेळात स्थानिक कलावंत, मुकुंद पवार, वसंत हावळे, अनंत मुळे, बालानंद पांडे, उल्हास पांडे, सचिन काळे, जगताप, गवळी, यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ६ ते ७ यावेळेत अजय सुगावकर यांचे गायन तर रात्री ८ ते १० या वेळेत औरंगाबाद येथील गिरीश गोसावी व संच यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ६ ऑक्टोबर रविवारी सकाळी ७ वाजता अष्टमीच्या दिवशी होमहवन पुर्णाहुती महापुजा होणार आहे. सकाळी ११ वाजता अक्षय यादव यांच्या नृत्याचा कार्यक्रम तर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पंचमवेद अ‍ॅकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट अंबाजोगाई यांच्या डॉ. शारदापुत्र विनोद निकम, अनुराधा निकम व त्यांच्या शिष्यवृंदांचा भरतनाट्यम हा कार्यक्रम होणार आहे. ८ ऑक्टोबर मंगळवारी विजया दशमीनिमित्त दुपारी १ वाजता श्री योगेश्वरी देवीची पालखी अंबाजोगाई शहरातून निघणार आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष,सचिव व विश्वस्त मंडळांनी केले आहे.