बहुजन नायक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गायक राहुल अन्वीकर यांच्या प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम

अंबाजोगाई : बहुजन नायक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गायक राहुल अन्वीकर यांच्या प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. 

बहुजन नायक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 मार्च रोजी होणाऱ्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ, नितिन सिंग, मनिष कावळे, ॲड. संदीप ताजने यांची उपस्थिती राहणार आहे. 

राष्ट्रीय गायक राहुल अन्वीकर यांच्या प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ टाकणखार, डॉ. अनंत गायकवाड,  ॲड. अमोल डोंगरे, अविनाश शिनगारे, स. का. पाटेकर, अरविंद लोंढे, ॲड. बुद्धकरण उजगरे, सुनिल कांबळे, सुरेश कांबळे, सतिश काळे, सुरेश कांबळे, सतिष कापसे, प्रविण मस्के यांच्यासह आदीजण परिश्रम घेत आहेत.