मुुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवारांची वयोमार्यादा संपल्यास त्यांना आता दोन वर्षांची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यांच्या विहीत वयोमर्यादेत तब्बल 2 वर्षांची वाढ करण्यात आली आहे. हा लाभ केवळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी मिळणार आहे. या संदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने काढले असून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. सरकारने 3 मार्चला निर्णय घेतल्यावर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
कोरोनाची वाया गेलेली दोन वर्ष तसेच विविध कारणांमुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने अनेज उमेदवार परीक्षेपासून मुकले. दरम्यान, अनेक उमेदवारांची वयोमार्यादा संपल्याने त्यांच्या मोठ्या संधी हुकल्या. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा एक संधी मिळावी, या हेतूने राज्य सरकारने 2 मार्च रोजी 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी असेलल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. या बाबतचा शासन आदेश काढल्यावर राज्य लोकसेवा आयोगाने देखील परिपत्रक काढत या आदेशांवर शिकामोर्तब केले आहे.
सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.