अर्थसंकल्पातून 15 रस्त्यांच्या कामांसाठी 31 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर
तडोळा येथील पुलाचा निवडणुकीत दिलेला शब्द मुंडेंनी केला पूर्ण !
मुंबई : परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार अर्थसंकल्पातून मतदारसंघातील 15 प्रमुख ग्रामीण मार्गांच्या रस्ता सुधारणा, लहान व मोठ्या पुलाचे बांधकाम अशा कामांसाठी एकूण 31 कोटी 51 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
परळी मतदारसंघात ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते व्हावेत, यासाठी धनंजय मुंडे सातत्याने आग्रही असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून आ. मुंडेंनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
त्याचेच फलस्वरूप मतदारसंघात निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करत अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा गावाजवळील मांजरा नदीवर रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 11 कोटी, अंबावळण ते पोखरी रस्ता सुधारणा – 1 कोटी 25 लाख, अंबावळण ते भारज पांदण रस्ता सुधारणा – 1 कोटी 25 लाख, सायगाव – सुगाव ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा – 51 लाख, प्रजिमा 56 ते राडी – मुडेगाव रस्ता सुधारणा – 1 कोटी, राडी तांडा ते मुडेगाव रस्ता सुधारणा – 1 कोटी, घाटनांदूर ते नवाबवाडी रस्ता सुधारणा -1 कोटी 50 लाख, ग्राममा 548 (डी) ते जोडवाडी धसवाडी रस्ता सुधारणा – 1 कोटी, कुसळवाडी ते मूर्ती रस्ता सुधारणा – 1 कोटी 50 लाख, चंदनवाडी ते लिंबगाव रस्ता सुधारणा – 1 कोटी 50 लाख, प्रजिमा 58 ते भारज – सायगाव रस्ता – 1 कोटी, खापरटोन ते दैठणा रस्ता सुधारणा – 1 कोटी 50 लाख, दैठणा जोड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी – 1 कोटी, परळी तालुक्यातील कौठळी ते धामुनी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम – 2 कोटी 50 लाख, खतगव्हाण ते पोहणेर रस्त्यामध्ये सुधारणा – 4 कोटी या 15 कामांचा समावेश आहे. त्याचबरोबर परळी व केज या दोन मतदारसंघात असणाऱ्या आपेगाव – देवळा – अकोला या रस्त्यात सुधारणा करण्यासाठी 5 कोटी तसेच दस्तगिरवाडी ते पोखरी रस्ता सुधारणा करण्यासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार या ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.