मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत 38 कोटी 60 लाखांची मदत

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत 4 हजार 800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे.

जुलै 2022 मध्ये महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली.

राज्यातील सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, त्यानुसार रुग्णांना दिलासा देण्यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी सांगितले.