बीड : बीड येथे येत्या 1 मार्च या दिवशी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, जनसुनावणी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी होणार आहे.
यावेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित असतील. या उपक्रमाअंतर्गत विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येतं.
ही जनसुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात येणार असून यात अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे.