औरंगाबाद : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोविडनंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून 2 लाख 60 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने रद्द केला असून, परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटं देण्यात येणार आहेत.
परीक्षेचं साहित्य केंद्रांना वितरीत झालं असून, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं, असं आवाहन शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागीय सचिव व्ही. व्ही. जोशी यांनी केलं आहे.