नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्यापासून (14 फेब्रुवारी) नियमित सुनावणी होणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या याचिका उद्या सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ सुनावणीस घेणार आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षांना कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते.