मुुंबई : मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता नागराज मंजुळेच्या ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटातील पहिलं गाणं आता समोर आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची प्रेक्षक वाट पाहत होते. आता त्या गाण्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.
यंदाच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला प्रेम अधिकच बहरणार आहे. कारण ‘झी स्टुडिओज्’ आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत ‘घर बंदूक बिरयानी’ या नव्या आगामी चित्रपटातील प्रेमाची चाहूल देणार पहिलं ‘गुन गुन’ हे नवंकोरं प्रेमगीत ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. ‘गुन गुन’ या प्रेमगीताच्या माध्यमातून आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज आपल्याला या गाण्यातून दिसतोय.