मुुंबई : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ राज्यात पाचशे ठिकाणी सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले..
आजच्या दिवसाचं औचित्य साधून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेच्या विस्ताराची घोषणादेखील मी या ठिकाणी करतोय. आणि मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यानुसार सुमार पाचशे ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ देखील होणार आहे.
‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियानाअंतर्गत आज राज्यात एकाच दिवशी 366 ठिकाणी रक्तदान शिबीर, 1800 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, एवढ्या मोठ्या संख्येनं राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सारे उपक्रम हाती घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.