‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप मुदतीत वाढ

मुंबई : ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. 

‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना, नीट पीजी – 2023 परीक्षेसाठीच्या पात्रता अटीत अनिवार्य असलेल्या, एका वर्षाच्या इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठीच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

‘एमबीबीएस’ च्या विद्यार्थ्यांना आता 11 ऑगस्ट 2023 पर्यंत, तर बीडीएसच्या विद्यार्थ्यांना 30 जून 2023 पर्यंत इंटर्नशिप पूर्ण करता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.