रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे
पंढरपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमच्यात कुणीही नाराज नाही, असं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं आज ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या वैधते संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे आरोप चुकीचे आहेत. असं असतं तर पहिला मंत्रिमंडळ विस्तारही झाला नसता, असं भुमरे म्हणाले.
पक्षाने आदेश दिल्यास औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याचंही भुमरे यांनी स्पष्ट केलं.