मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये, याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
नवे मित्र जोडण्याला कुणाचा विरोध नाही, परंतू मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं.