गोवा महामार्गावर भीषण अपघात : 9 जणांचा मृत्यू

मुंबई : गोवा महामार्गावर माणगाव नजिक रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. 

जखमी झालेल्या चार वर्षाच्या एका मुलीला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई – गोवा महामार्गावर गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेपोली गावाजवळ हा अपघात झाला आहे. ट्रक आणि चारचाकीच्या या अपघातामध्ये 9 जणांचा जागीचा मृत्यू झाला. मात्र,  या अपघातामधून एक चार वर्षांची चिमुकली वाचली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातग्रस्त चारचाकी मुंबईवरून खेडला जात होती. याचदरम्यान ट्रक आणि या चारचाकीची धडक झाली.