घाटनांदूर : खाजगी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या 

घाटनांदूर : घाटनांदूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व खाजगी शिक्षक यांनी व्हाट्सॲपवर स्टेटस् ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.19) गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थीप्रिय खाजगी शिकवणी चालक नितेश काशिरामसिंग कोकणे (वय 40) यांनी सकाळी सव्वाआठ वाजता व्हाट्सॲप वरील स्टेटसवर चितेचा जळत असलेला व्हिडिओ अपलोड करून व ‘कुछ पल या बैठीए जनाब, दोलत का नशा उतर जायेगा ! मला माफ करा, आय ऍम सॉरी, असे स्टेटस् ठेवून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

एका उच्चशिक्षित खाजगी शिक्षकाने असे जीवन संपवल्याने ग्रामस्थांतून व विद्यार्थ्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोकणे यांच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.