अंगणवाडी सेविका पदासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी वरून बारावी उत्तीर्ण 

मुंबई : अंगणवाडी सेविका पदासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी वरून बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आली आहे.

अंगणवाड्यांमधील 75 लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. 

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 20 हजार जागांची भरती केली जाणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर 26 जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.