काठमांडू : एटीआर 72 प्रवाशी विमान आज सकाळी नेपाळमधल्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर कोसळलं. विमानात 68 प्रवासी आणि चार कर्मचारी होते. अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आलं आहे. यती एअरलाईन्स या प्रवासी कंपनीचं हे विमान आहे.
जुने विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दरम्यान हा अपघात झाला. पोखरा विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 मिनिटात विमानाचा नियंत्रण कक्षाशी संबंध तुटला आणि त्यानंतर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार विमानातील 63 जणांचा मृत्यू झाला, यापैकी 63 जणांचे मृतदेह प्राप्त झाले असल्याचं नेपाळच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनं सांगितलं.