मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34 वरून 38 टक्के झाला आहे. वित्त विभागाने काल याबाबतचा आदेश जारी केला आहे.
महागाई भत्त्यातली वाढ 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह, यंदाच्या जानेवारी महिन्यातल्या वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश, वित्त विभागाने जारी केले आहेत.