अंबाजोगाईत निघाला भव्य हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अंबाजोगाई : लव्हजिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, गोहत्या रोखण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 10 जानेवारीला अंबाजोगाईत भव्य हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा निघाला होता.

मंगळवारी सकाळी हा मोर्चा कुत्तरविहिर परिसरातील तानाजी मालुसरे चौकातून निघाला. यावेळी मध्यवर्ती हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोंचला.

यावेळी मोर्चातील निवडक प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. सदरील मोर्चा हा माता भगिनींच्या रक्षणासाठी, गोमातेच्या संवर्धनासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी निघाला होता. गोहत्या रोखण्यात याव्यात, यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चात अंबाजोगाई तालुक्यातील हिंदू समाजबांधव, महिला व युवकांचा मोठा सहभाग होता. 

भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष, गोमतेचे दर्शन

अंबाजोगाईत  निघालेल्या भव्य अश्या हिंदू धर्मरक्षण मूकमोर्चात प्रत्येक मोर्चेकऱ्याने आपल्या डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. तर मोर्चातील मोठमोठे भगवेझेंडे लक्षवेधी ठरले. त्यासोबत  अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपल्या गाईही मोर्चात सोबत घेऊन येत पशुपालन व गोमतेचे रक्षण व सनवर्धनाचा संदेश दिला.  

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंबाजोगाई शहरातून निघालेल्या हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चासोबत पोलीस पथकाची एक तुकडी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली होती.