विकृतीदायक चित्रफीती तसंच प्रतिमा प्रसारित करू नये : प्रसारण मंत्रालय

नवी दिल्ली : विकृतीदायक चित्रफीती तसंच प्रतिमा प्रसारित करू नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना केली आहे. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी व्यक्तींचे चित्र किंवा मृतदेह असलेल्या प्रतिमा अस्पष्ट करण्याची खबरदारी न घेता अशा घटनांच्या वार्तांकनाची पद्धत अनेक प्रेक्षकांसाठी त्रासदायक असून याचा मुलांवर प्रतिकूल मानसिक परिणाम देखील होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या संदर्भात संहितेचं पालन करावं, असं मंत्रालयाकडून जारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.