अंबाजोगाई : राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.
अंबाजोगाई शहरातही गेल्या दोन – तीन दिवसात पहाटे आणि रात्री बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना अंबाजोगाईकरांना थंडीपासून बचाव करणाऱ्या उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
काल राज्यात सगळ्यात कमी सहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं.
औरंगाबाद आणि परभणीमध्ये सरासरी नऊ तर, उस्मानाबाद मध्ये दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.