मुबई : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या 32 संघटनांसोबत आज बैठक घेतली.
वीज कंपन्याचं खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नसून, या कंपन्यामध्ये 50 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..
राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. याउलट पुढच्या तीन वर्षांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही.