अंबलटेक ग्रामपंचायतवर ‘महिलाराज’ : सरपंचपदी पंचशिला गोडबोले तर उपसरपंचपदी राधाबाई नागरगोजे

अंबाजोगाई : अंबलटेक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पंचशिला भास्कर गोडबोले यांची निवड झाली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात शुक्रवारी (दि. 30) बैठक झाली. यात उपसरपंचपदी राधाबाई भगवान नागरगोजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अंबलटेक येथील जेष्ठ नेते भास्करराव रघुनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील माधवबाबा ग्रामविकास पॅनलला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश आले. त्यांच्या पॅनलकडून सरपंचपदी पंचशिला भास्कर गोडबोले या विजयी झाल्या. त्यांच्याच पॅनलमधून बळीराम जगन्नाथ नागरगोजे, राधाबाई भगवान नागरगोजे, गंगाधर बाबाजी मुंडे, मंदाकिनी भगवंत नागरगोजे, जयश्री तुकाराम नागरगोजे यांची सदस्यपदी निवड झाली.

सर्व सदस्यांमधून उपसरपंच पदासाठी राधाबाई भगवान नागरगोजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. उपसरपंच निवडीसाठी निरीक्षक म्हणून डॉ. दिपक लोखंडे, ग्रामसेवक एल. एम. घुगे उपस्थित होते.