विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय 

नवी दिल्ली : जगातल्या काही देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी चर्चा करून तात्काळ ही चाचणी अनिवार्य करण्यात येईल. 

भारतात आल्यानंतर कोणालाही तापासारखी कोविडची लक्षणं आढळली किंवा RTPCR चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं तर त्या रुग्णाला तत्काळ विलगीकरणात पाठवण्याचे आदेश आरोग्य मंत्रालय जारी करेल, असं मांडवीय यांनी सांगितलं.