अंबाजोगाई – अहमदपूर महामार्गावर अपघात : गिरवली पाटीवर अनाधिकृत चौकाला कार धडकली, एकाचा मृत्यू

अंबाजोगाई : अंबाजोगाई – अहमदपूर महामार्गावरील गिरवली पाटीवर अपघाताची घटना घडली असून या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सांयकाळी 9 च्या सुमारास झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई  तालुक्यातील धर्मापुरी जवळील मौजे सौंदना येथील रहिवासी सुर्यकांत (सुनिल) पाटलोबा फड (वय 30) हे त्यांच्या गावच्या मित्रासोबत गावाहून एमएच 24 ऐडब्ल्यू 4826 इरटिका या कारने अंबाजोगाईला येत होते. गिरवली पाटीवर कार आली असता रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या अनाधिकृत चौकाला कार धडकली. या धडकेत कारमधील सुर्यकांत फड यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणाऱ्याचे काय झाले ? याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या अनाधिकृत चौकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, अशां चौकांबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलिस करित आहेत.