भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करुन अभिवादन केलं.

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. दादरच्या इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं काम लवकरात पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. दरम्यान, देशभरातून मुंबईत चैत्यभूमीवर अनुयायी दाखल झाले आहेत.