ग. दि. माडगुळकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर 

पुणे : ‘गदिमा’ प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा ग. दि. माडगुळकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेते डॉ.  मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 

‘गदिमा’ यांच्या स्मृतिदिनी येत्या 14 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासोबतच साधना बहुलकर यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार, अभिनेते प्रवीण तरडे यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका योगिता गोडबोले यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

या समारंभात शितल माडगुळकर यांनी लिहिलेलं ‘गदिमांच्या पंचवटीतून’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.