पुणे : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने यंदा खरिपाचं मोठं नुकसान केलं आहे. तर राज्यात दमदार पावसामुळे रब्बी हंगामातील पेरा यंदा वाढला आहे.
नोव्हेंबरअखेर 40 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, डिसेंबर अखेपर्यंत रब्बीचं क्षेत्र 65 लाख हेक्टरवर जाईल, अशी माहिती, कृषी विभागाने दिली आहे.
नोव्हेंबर अखेर राज्यात 39 लाख 29 हजार 792 हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती विकास आणि विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.