नवी दिल्ली : रिझर्व बॅंकेनं आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरू केलं आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर हे चलन ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना मर्यादित वापरकर्त्यांच्या गटात उपलब्ध झालं आहे.
या चलनाचं मूल्य कागदी आणि नाण्यांच्या मूल्यांइतकच राहणार आहे. याद्वारे मध्यस्थी बॅंका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. यासाठी आठ बॅंका निश्चित करण्यात आल्या आहेत. या चलनाची सुरवात पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये करण्यात आली आहे.
वापरकर्त्याच्या मोबाईल फोनवर बॅंकेनं उपलब्ध करुन दिलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून या डिजिटल पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. डिजिटल चलन हे रिझर्व बँकेच्या रोख रुपयांचं डिजिटल रुप असून संपर्करहीत व्यवहारांमध्ये याचा वापर करता येईल.